Abdul Sattar | “शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने”; अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला
Abdul Sattar । औरंगाबाद : राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदे गटातील 22 आमदार नाराज आहेत, असं म्हणण्यात आलं आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाष्य केलंय. शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असं सत्तार म्हणालेत.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, 22 आमदार नाराज हे मुंगेरीलाल के सपने आहेत. ते कधी खरे होत नाहीत. हे लोक गणपतीला आठवत बसले आहेत. कधीतरी हे 22 आमदार नाराज होतील. यांच्या पोटात जो पोटशूळ उठलेला आहे. तो कमी होईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यांच्याकडे जे उरलेले 15 आमदार आहेत. ते सांभाळले तरी फार झालं. त्यांनी आपले आमदार सांभाळावेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आलीय. पूर्वी ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होते. शेतकरी गोरगरिबांना मदत करायला हवी होती ती न केल्याने ही वेळ आली. शिवसेनेकडील 55 आमदारांची फौज होती. त्यापैकी 40 आमदार शिंदेगटात आहेत. उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार राहिलेत. हे लोक आपल्याला सोडून का गेले याचं त्यांनी चिंतन करायला हवं, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.
यावेळी बोलताना अब्दुल सत्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरही टीका केली आहे. ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान सत्तारांच्या याच टीकेला ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खौरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असे खैरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- India vs Pakistan । सूर्यकुमार यादवबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य, म्हणाला….
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी कोणत्या गोष्टी असतात आवश्यक, जाणून घ्या
- Abdul Sattar | ‘रस्त्यावर उतरू’ असा इशारा देणाऱ्या अंबादास दानवेंना अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले..
- Ram Shinde | “चॉकलेटवर सगळेच…”, रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचा पलटवार
- Raju Patil । “मनसे भाजपा-शिंदे गटासोबत युती करणार का?”; राजू पाटील म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.