Abdul Sattar | “सुप्रिया सुळे इतकी भिकाXXX झाली असेल तर…” अब्दुल सत्तारांची जीभ घसरली, थेट शिवीगाळ केली

Abdul Sattar |  मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय.

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे (sadanand Sule) यांच्या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही. “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत,” असं ट्वीट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही  काय सांगाल? असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं असल्याचा हा व्हिडीओ आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?” असा सवालही रोहित पवार यांनी भाजपला केलाय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.