Abdul Sattar | सोनेरी अक्षरात आमच्या उठावाचा उल्लेख होणार; मी एकदम निवांत – अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वी अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. आमचा हा उठावाचा उल्लेख सोनेरी अक्षरात केला जाणार आहे. निकालाबद्दल मला कोणत्याही प्रकारची धाक-धूक होत नाही. धाक-धूक त्यांना होते जे कमकुवत असतात.

पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यांच्याकडे हिंमत असते त्यांना कधीच धाक-धूक होत नाही. त्यामुळे मी एकदम निवांत आहे. निर्णय आमच्याच बाजूने लागणार आहे. जर निर्णय आमच्या बाजूने नाही लागला तरीही आम्ही न्यायालयाचा निर्णय हसत मुखाने स्वीकारणार आहोत.”

दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भारतामध्ये लोकशाही आहे की नाही याचा उद्या निकाल लागणार आहे. पाकिस्तानच्या संविधानाप्रमाणे आपले संविधान जळून खाक होणार आहे का? हे देखील उद्याच कळणार आहे. उद्याचा न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. उद्या या देशाचा फैसला होणार आहे.”

महत्वाच्या बातम्या