Abdul Sattar vs NCP | “अब्दुल सत्तार भिकाऱ्यांच्या यादीत, जीभ छाटू” ; सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक!
Abdul Sattar vs NCP | मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असे सत्तार म्हणाले.
सत्तार पुढे म्हणाले, “भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
विद्या चव्हाण आक्रमक-
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आक्रमक झाल्या आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, “अब्दुल सत्तारला म्हणावं भिकारी चारणे, दहा रुपयाची भीक मागतो काय आणि ५० कोटींची मागतो काय तुम्ही भिकाऱ्यांच्या यादीत आहात. फार कौतुक केल्याने तुम्ही मंत्री झाला नाहीत. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे घटनाबाह्य मंत्रिमंडळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहित आहे ती अब्दुल सत्तार काय आहेत. अमित शहा आणि मोदींचे पाय चाटून हे मंत्री झाले आहेत. त्यामुळे यांच्या जिभा घसरल्या तर जिभा छाटण्याचे काम आम्हाला करावे लागेल.”
“अब्दुल सत्तार तुम्हाला शरम वाटते का?, कधी महाराष्ट्रातून तु निवडणून येऊन दाखव. आम्ही निवडणून येऊ देणार नाही. नुसते माफीने आता काम चालणार नाही. महिला नेत्यांना शिव्या देण्याचे काम जर अब्दुल सत्तार करत असतील तर या अब्दुल सत्तार महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही. यांनी ताबोडतोब राजीनामा दिला पाहीजे”, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | तुम्ही मॅनेज झालेत का?, नवनीत राणांवर कारवाई का नाही?, कोर्टाचा पोलिसांवर संताप
- Devendra Fadanvis | “मराठा समाजासाठी…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचं मोठं विधान
- Gulabrao Patil | महिला शिवसैनिकांकडून गुलाबराव पाटलांच्या पोस्टरला चप्पलांचा मार, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन
- Bipasha Basu | आलिया भटच्या पाठोपाठ बिपाशा बसू ही लवकरच देणार गुडन्यूज
- Aditya Thackeray | ‘सत्तेत असताना झोपा काढल्या अन् सत्त गेल्यावर…’, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.