Abhay Bang | “महाराष्ट्राचे राजकारण दारूच्या पैशांवर…”; डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान 

Abhay Bang | नागपूर : वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. सर्च या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांची आज प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत डॉ. अभय बंग यांनी गंभीर आरोप केले आहेत.

 “महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात”, असा गंभीर आरोप डॉ. अभय बंग यांनी केला. ते म्हणाले, दारूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र तर मद्यराष्ट्र झाले आहे. दरवषी आपल्या राज्यात २ लक्ष कोटींची दारू पिली जाते.

दारू पिणाऱ्यांना अंनिसच्या ताब्यात द्या असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. “दारू आरोग्याला चांगली आहे म्हणणारे अडाणी आहेत. मी असं म्हणतो आहे कारण २०१७ मध्ये आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा अभ्यास झाला. त्यात चार अब्ज लोकांच्या आरोग्याचा डेटा वापरला गेला. त्याला ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ (Global Burden of Disease Study) असं म्हणतात. तो अभ्यास अत्यंत महत्त्वाचा होता,” अशी माहिती अभय बंग यांनी दिली.

या अहवालात सांगितल्याप्रमाणे, जगात मृत्यू, रोग आणि विकलांगता याची जेवढी कारणं आहेत त्यातील सर्वात वरच्या सात कारणांमध्ये एक कारण दारू आणि दुसरं तंबाखू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दारू आणि तंबाखू हे निव्वळ सुखद किंवा गंमत देणारे पदार्थ राहिलेले नाहीत. ते आधुनिक प्लेग आणि कॉलरा आहेत, असं डॉ.बंग म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.