Abhijeet Bichukale | Kasba Bypoll Election 2023 | पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय आहे. या पोटनिवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. त्यातच आता या पोटनिवडणुकीला रंग आला आहे तो आणखी एका उमेदवारीने. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. कारण या कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bhichukale) यांनी उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले यांनी मंगळवारी कसब्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अभिजीत बिचुकलेंचा उमेदवारी अर्ज दाखल ( Abhijeet Bichukale Kasba by-election )
काही दिवसांपूर्वीच अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
“भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येतोय”- Abhijeet Bichukale
“जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे”, असे अभिजीत बिचुकले यांनी सांगितले आहे.
वरळी विधानसभा – Abhijeet Bichukale Worli Assembly Election
अभिजीत बिचुकले यांनी या आधी 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवली आहे. बिचुकले यांना दोन्ही मतदारसंघातून फक्त 1540 मतं मिळाली होती. अभिजीत बिचुकले यांनी शिवसेनेचे युवानेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत बिचुकलेंचा पराभव झाला होता. आणि आता अभिजीत बिचुकलेंनी पुन्हा कसब्याची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकले हे नेहमीच आपल्या स्टाईल सेन्स, शैली आणि वक्तव्यांमुळे प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघाच्या निवडणुकीतील त्यांचा प्रचार नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासारखे तगडे उमेदवार एकमेकांविरोधात असताना अभिजीत बिचुकले कोणत्या मुद्द्यावर कसब्यातील ( Kasba Bypoll Election 2023 ) मतदारांना मत मागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
- Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य
- Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य
- By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज
- Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा