Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार

Abhijeet Bichukale | मुंबई : मनसे नेते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. “सकाळी-सकाळी संजय राऊत बोलायला सुरूवात करतात. मला ईडीला विचारायला लागेल यांना तुरुंगात टाकलं होतं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं. सकाळी सकाळी संजय राऊत कडक गांजा मारतात. संजय राऊतांना वाटतं तेच भगवान आहेत. ऐवढा आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनचं माणसांमध्ये आहे. एक संजय राऊत आणि दुसरे अभिजीत बिचुकले”, असे गजानन काळे म्हणाले होते. यावरुन अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांच्यावर पलटवार केला आहे.

“त्या माणसाचे नाव काय आहे. त्याला नाव देतो. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. राज ठाकरे यांना सांगतो तुमचा जो पदाधिकारी आहे. त्याचे नाव आजपासून गांजा काळे आहे. तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकुंजवर तुझं कानफाड फोडीन. तू गांजा ओढला का?, तुझ्या रक्तात गांजा आहे का?. राज ठाकरे आहेत म्हणून उड्या मारु नको,” असे अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांना ठणकावून सांगितले आहे.

“गांजा काळे यांच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय. माझ्या दृष्टीने गजा काळे म्हणजे कृष्णकुंजच्या समोर रोड क्रॉस केल्यानंतर तिथं माझं येणं जाणं असतं, बाजूला गटारावती उभं करतात ते राज ठाकरेंचं डुक्कर म्हणजे गांजा काळे”, असे म्हणत खालच्या पातळीची टीका केली आहे.

कोणाशी बोलतो? कोणाची थट्टा करतो? असले नालायक लोक राज ठाकरेंनी पक्षात ठेवले आहेत. त्यांचे 14 वरुन १ आमदार झालेत. गांजा काळेसारखे लोक जर तिथे असतील तर मी स्वत: पक्षवाला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला आणि स्त्री वर्गाला सांगू इच्छितो मला खऱ्या अर्थाने ‘मर्द मराठा’ म्हणायचं जो मरने से नही डरता. म्हणून मी माझ्या पत्नीचे नाव महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून घेतले आहे. कोणत्या मर्दामध्ये दम होता का?, असेही गजानन काळे म्हणाले आहेत.

‘हाती चले बझार, कुत्ते भोंके हजार’

“गांजा काळे माझ्या जळतो आहे. माझ्या हेअर स्टाईलवर जळतोय. गांजा काळेला हे माहिती होतं की, अभितीत बिचुकले साहेबांचे नाव घेतल्यानंतर प्रसिद्धी मिळेल. पण डुकरा तुला कोणी टाळ्या नाही वाजवल्या. इथं मनसेमध्ये माझे खूप फॅन आहेत. महाराष्ट्राच्या नावातच माझी जात आणि धर्म आहे. महाराष्ट्राचं नाव निट वाचा मला शिंगावर घेशील ना तर एकच सांगतो. राज ठाकरे आमचे बंधू आहेत त्यांच्या दारातला तो रोग लागलेला कुत्रा आहे आणि मी हत्ती  आहे. ‘हाती चले बझार, कुत्ते भोंके हजार’ या नालायक माणसाला मी बोललो तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकुंजवर गांजा काळेच्या कानाखाली जाळ काढीन” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

“त्याला शाहरुख खानचा पुळका आलाय. तो सुपरस्टार आहे ‘किंग ऑफ रोमांस’ आहे आणि मी ‘किंग ऑफ महाराष्ट्र’ शिवाजी राजांचा वैचारीक वारस पण तलवार नाही वापरत पेन वापरतो. राजेशाही असती तर तलवार घेऊन आलो असतो. लोकशाही आहे माझ्या बाबासाहेबांची. शाहरुख खानच्या ‘पठाण’चा जर पुळका आला असेल तर त्याची जात आहे पठाणाची. गांजा काळे तुझ्या घरी घेऊन जा पठाणला. आणि तुला येत नसेल तर मी आणून सोडतो त्याला तुझ्या घरात. मग काय करायचं ते करुन घे तुझ्या घरात” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.