Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
Abhijeet Bichukale | पुणे : बीगबॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीव अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायत, कसब्यातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले सध्या घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. पत्रके वाटप करत गाठीभेटी घेत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
“मोठ्या मताधिक्याने माझा विजय होईल”
‘मोठ्या मताधिक्क्याने माझा विजय होईल’, असा विश्वास बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. ‘मी लवकरच माझा नवा पक्ष काढणार असून माझ्या पक्षाची पहिली महिला मुख्यमंत्री माझी पत्नी होणार’ असं अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे आहेत. मीही साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा. सर्व प्रश्न लगेच सुटतील”, असे अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.
“माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला तुमचा प्रश्न सोडवेल”- Abhijeet Bichukale
“मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांचा सोडवणार”, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला. आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय 2023 आणि विद्यार्थी म्हणतायत 2025. मात्र यामध्ये 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.
“मला निवडणूक नाही तर तुमचे प्रश्न महत्वाचे”
अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोटनिडणुकीत उभे आहेत. निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस उरलेले असतान बिचुकले प्रचार सोडून विद्यार्थ्यांना भेटायला आले आहेत. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं. “मला निवडणूक महत्त्वाची नसून मला या विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलोय”, असं अभिजीत बिचुकले यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
- Sanjay Raut | “फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतायेत”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Gulabrao Patil | “एकच पिक्चर बघून लोक बोअर झालीत, दुसरं काहीतरी वेगळं करा” गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
- Sanjay Raut | “माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”; राऊतांचा गंभीर आरोप
- Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे
Comments are closed.