अमिताभ बच्चन यांच्या कौतुकानंतर अभिषेकची प्रतिक्रिया; म्हणाला…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेचे सर्वचजण कौतुक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकचे कौतुक केले आहे. दरम्यान यावर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक बच्चनने नुकतंच वृत्तपत्राशी बोलताना ‘बॉब बिस्वास’चित्रपटाबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला, “मी भारावलो होता, भारावलो आहे आणि यापुढेही असेन. मी त्यांचा मुलगा आणि सर्वात मोठा चाहता आहे. तुमच्या सर्वात आदर्श व्यक्तीला कामाची जाणीव असणे, त्यांनी तुमचे काम पाहणे हीच एक कौतुकाची थाप आहे. जर तुम्ही चांगले काम करत असाल तर ते तुम्हाला एकटं सोडतात आणि त्यांना वाटते की मी चांगले काम करत आहे, असे त्याने सांगितले.

“बॉब बिस्वास’ या चित्रपटाकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्यांचा अपेक्षांचा भंग कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, असे मला वाटते. माझ्या वडिलांनी माझे कौतुक केले याचा मला निश्चितच आनंद आहे. पण मी थोडा घाबरलो आहे. त्यांनी ट्रेलर पाहिला आणि त्यानंतर त्याबद्दल काहीतरी लिहिले हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. यामुळेच मला आता भीती वाटत आहे. कारण हा चित्रपट उत्तम असावा अशी माझी इच्छा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून बिग बींनाही अपेक्षा आहेत. त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा आहे,” असे अभिषेक म्हणाला.

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा