InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश ग्राह्य धरले जावेत यासाठी ‘अभाविप’चा राज्य सरकारकडे पाठपुरावा

- Advertisement -

राज्यात मराठा विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश, त्यासाठी आंदोलन, यावर न्यायालयाची भूमिका, सरकारची भूमिका यावरुन महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. परंतू सरकारने अखेर यावर अध्यादेश जारी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली.

याबाबत अभाविपने देखील सरकार पुढे आपली भूमिका मांडत विद्यार्थींचे रद्द करण्यात आलेले प्रवेश ग्रह्य धरावे आणि सरकारने त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावी अशी भूमिका मांडत पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने विद्यार्थींच्या पाठीशी उभे राहत  सर्व विद्यार्थ्याचे प्रवेश कायम रहावे यासाठी अध्यादेश जारी केला आहे. सरकारने काढलेल्या या अध्यादेशाच्या निर्णयाचे अभाविपकडून स्वागत करण्यात आले आहे.

- Advertisement -

“मराठा प्रवर्गातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 228 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊ नये म्हणून सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे अभाविप स्वागत व अभिनंदन करते. सरकारने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विषयात जातीने लक्ष घातल्याने, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आता टळले जाईल”, असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी मांडले. “या प्रवर्गाअंतर्गत पुढे मिळू शकणाऱ्या प्रवेशाबाबतही अभाविप सरकारकडे पाठपुरावा करणार आहे” असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.