InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुंब्रा येथील तिहेरी तलाक प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन

- Advertisement -

राज्यात तिहेरी तलाक प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या पहिल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित आरोपी इम्तियाज पटेल यास तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणात संपूर्ण अहवाल न्यायालयात दाखल होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

मुंब्र्यातील एका महिलेने ‘मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा’ अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीने व्हॉट्सअ‌ॅपवर 3 वेळा तलाक असे लिहून तिला गेल्या वर्षीच घटस्फोट दिला होता. त्यामुळे या महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नव्याने बनवण्यात आलेल्या तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

तिहेरी तलाक प्रकरणी केंद्रात विधेयक पारित झाल्यानंतर पहिला खटला हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात नोंदवण्यात आला होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदण्यात आला होता. ज्यामध्ये पीडित महिलेला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.