पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

पुणे  : पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय. बिबवेवाडी परिसरात एका मुलीचा नात्यातील तरुणाने कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

क्षितीजा व्यवहारे (वय १४) असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. याबाबत माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. यानंतर अखेर १२ तासांच्या आता या हत्या प्रकऱणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी हत्या करुन लपून बसला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ आरोपीला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स परिसरात आरोपी लबून बसला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा