अचंता शरत कमल याच्या ऑलिम्पिक मोहिमेला मिळाले बळ

भारताचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल याच्या ऑलिम्पिक मोहिमेला बळ मिळाले आहे. पुण्यातील “लक्ष्य” या क्रीडा क्षेत्रातील अव्वल स्वयंसेवी संस्थेने शरथ कमलला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे त्याला ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करण्यास मदत होणार आहे.

तरूणांना रोजगार देण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ठ

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 9वेळा जिंकण्याचा मान मिळविणारा शरथ कमल हा पहिला खेळाडू असून त्याने कमलेश मेहताचा आठ राष्ट्रीय विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शरथने याआधी 2004, 2008 आणि 2016 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून आगामी टोकियो ऑलम्पिक ही त्याची चौथी ऑलिम्पिक स्पर्धा ठरेल.

याविषयी अधिक माहिती देताना “लक्ष्य”चे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, विश्व क्रमवारीत सध्या 33वे मानांकन असलेल्या शरथला टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही उत्तम संधी आहे. तसेच, तज्ञांच्या मते मिश्र दुहेरी गटांत मणिका बात्राच्या साथीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याची शरथला चांगली संधी आहे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.