एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या अनुषंगाने कारवाई चुकीची : देवेंद्र फडणीस

औरंगाबाद : एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे म्हणून 29 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हि मागणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे. सरकारने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर परत रुजू होत आहेत.

मात्र सरकार म्हणून केवळ कर्मचाऱ्यांचा विचार करून आम्हाला चालणार नाही तर एसटीवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील तमाम सर्वसामान्य कष्टकरी जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असा इशारा मंत्री, परब यांनी काल दिला.

मात्र अजूनही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले असून कामावर येण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईची भूमिका घेण्याचा विचार करत असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर टीका केली आहे.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकराची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न सरकारकडून होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं. पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं, ते सरकार येत नाही.’ तसेच काल मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा’, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा