InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई…..

अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

या दोघांचा ५ ऑगस्टला पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला होता. हा साखरपुडा देखील कोणताही गाजावाजात न करता केला होता.

त्यावेळी याबाबत स्नेहाला विचारले असता ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply