InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -

सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गितांजली कुलकर्णी या दाम्पत्याने देखील गोरेगाव मतदार केंद्रावर मतदान केले आहे. ‘मतदान करताना आपण मतदानाच्या दिवशी किंवा पंधरा दिवस अगोदर कुणाला मतदान करायचं? हा विचार करतो पण हे बरोबर नाही. पाच वर्ष आपण यावर समग्र विचार करायला हवा,’ असं अतुल कुलकर्णी यांने सांगितले. तसेच गितांजली कुलकर्णीने देखील सांगितलं की, ‘आपण कुणाला मतदान करतो? याचा विचार मतदाराने करायला हवा. पुढची दिशा काय आहे हे देखील आपण बघायला हवं’.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.