InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रविण तरडे ट्रोल- फेसबुकवरील कमेंटने सोशल मिडीयावर धुराळा

‘मुळशी पॅटर्न’फेम अभिनेते प्रविण तरडे याला भाजप समर्थनार्थ पोस्ट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ‘संपूर्ण देश भाजपसोबत आहे’, अशी फेसबुक कमेंट प्रविण तरडेंनी केली आणि ते चांगलेच ट्रोल झाले. तरडेंच्या फेसबुकवरील एका कमेंटने सोशल मिडीयावर धुराळा उडाला आहे. प्रवीण तरडे यांच्याविरोधात नेटकर्यांकडून संताप व्यक्त केला जात असून तरडेंच्या कमेंटवर आतापर्यंत जवळपास 3 हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. तरडे यांच्या कमेंटवर अनेकांनी नकारार्थी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

Loading...

एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा.

Raju Parulekar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 7, 2020

- Advertisement -

पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, ‘एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात, ठरवा’  अशी पोस्ट केली होती. त्या पोस्टवर प्रवीण तरडे यांनी ‘संपूर्ण देश भाजपसोबत आहे’, अशी कमेंट केली आहे. प्रवीण तरडे यांनी केलेल्या या कमेंटवर नेटकर्यांनी मात्र संताप व्यक्त करत तरडे यांना प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तरडे यांच्यावर कंमेंट डिलीट करण्याची नामुष्की आली.

संपूर्ण देश जर भाजपसोबत असेल तर सीएएच्या विरोधात आंदोलन करणारे काय मंगलगृहावरून आलेत काय? आणि त्यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटातील डायलॉग टाकत आहे.

अमित परांडकर या तरुणाने तरडे यांना त्यांच्या क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला. गणपती, वाढदिवसाच्या सुपार्या आणि अक्टिंग कडे लक्ष देण्यास सुचवले.

जेएनयुत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशपातळीवर संतापाच वातावरण आहे, त्यात त्यांनी कमेंट करुन ट्रोलिंग स्वतःवर ओढावून घेतलं आहे. या कमेंटवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार सुरू झाला आहे.

तत्पूर्वी, नेटीझन्स आणि काही कार्यकर्त्यांकडून प्रवीण तरडे यांना कॉल गेल्यावर आणि त्यांना ट्रोल केले गेल्यावर त्यांनी ही कमेंट डिलीट केली आहे. तरडे यांनी कमेंट डिलीट केल्यावर नेटकरी त्यांच्या वॉलवरील पोस्टमध्ये त्या कमेंटचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

‘हप्ता चालू काम बंद’; किरीट सोमय्या यांची महाविकास आघाडीवर टीका

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.