काम देण्याच्या नावाखाली मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता जॅकी भगनानी सह आठ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : झगमगीत अश्या बॉलीवूड इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काम देण्याच्या नावाखाली मॉडेलचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड आला आहे. याबाबत बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्यासह आठ जणांवर मॉडेलने विनयभंग आणि बलात्काराचा आरोप केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेलने आरोप केला आहे की, मॉडेलिंगमध्ये मोठी संधी देण्याच्या नावाखाली कोलस्टन ज्युलियनने 2014 ते 2018 दरम्यान तिच्यावर बलात्कार केला आहे. अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे येथे तिची छेडछाड केली, तर निखिल कामतने सांताक्रूझमधील फाइव स्टार हॉटेलमध्ये, शील गुप्ताने 2015 मध्ये अंधेरी येथील एका इमारतीत तिचा विनयभंग केला. अजित ठाकूरने 2018 मध्ये विलेपार्ले येथील इमारतीत तिच्यावर बलात्कार केला असल्याचे मॉडलने तिच्या FIR मध्ये सांगितले.

मॉडेलच्या तक्रारीनंतर सर्व आरोपींवर आईपीसी कलम 378 (एन), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉडेलने फोटोग्राफर तसेच क्वान एन्टरटेनमेंटचे संस्थापक अनिरबान ब्लाह, अभिनेता जॅकी भगनानी, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णू वर्धान इंदुरी यासगळ्या हाय प्रोफाईल लोकांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा