InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ ‘बाहुबली’ प्रभास अडकणार लग्नाच्या बेडीत

प्रभास राजू उप्पलपति यांचा (जन्म :२३ ऑक्टोबर १९७९) ला झाला. ते प्रभास या नावाने लोकप्रिय आहेत. प्रभास प्रामुख्याने तेलुगू चित्रपटात काम करतो. मिस्टर परफेक्ट, मिर्ची , बाहुबली  या हिंदी चित्रपटांमध्ये ‘”प्रभास”‘ ची मुख्य भूुमिका आहे. दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासही बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखला जाणारा प्रभास २०१९ मध्ये लग्न करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या लग्नाबद्दलच्या बातम्या येत आहे.

प्रभास ‘बाहुबली’ रिलीज झाल्यानंतर लग्न करणार होता. पण ‘साहो’ चित्रपटामुळे तो थांबला होता. प्रभास कुणासोबत लग्न करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

अनेक दिवसापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरु आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रभास लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु हा चित्रपट पूर्ण होत नाही तोच प्रभास ‘साहो’ चित्रपटामध्ये व्यस्त झाला. परंतु आता ‘साहो’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे २०१९ मध्ये प्रभास लग्न करणार आहे.

‘साहो’नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे. खुद्द प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली होती. युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला प्रभासचा हा आगामी चित्रपटही बिग बजेट चित्रपट असणार आहे.

प्रभास मुख्य भूुमिकेत असणारे चित्रपट- 

डार्लिंग प्रभास, मिस्टर पर्फेक्ट, ईश्वर, दैनिक आईना, रेबेल

मिर्ची, राघवेंद्र, अदावी रामडु, वर्षम

चक्रम, छत्रपती, बाहुबली

पूर्णमी, मुन्ना मुन्ना, योगी

बुज्जिगड़ू, एक निरंजन, बिल्ला

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.