InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

राष्ट्रपती राजवटीवर काय म्हणाला रितेश देशमुख….

महाराष्ट्रातील सध्याची सर्वात महत्तवाची आणि मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे अखेर मंगळवारी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावर अनेकांनी मतप्रदशने केली असतानाच अभिनेता रितेश देशमुख यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे.

राष्ट्रपती राजवटीवर रितेश म्हणाला,’ सध्या राज्यातील स्थिती काय आहे याची मला जाणीव आहे. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विरोधी बाकांवरच बसणार होते. शिवसेनेचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री आणि सत्तेतील समान वाटा या भूमिकेसह महायुतीला बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने भाजपासोबत जाण्याचे टाळले. राज्याचे मुद्दे लक्षात घेता एका स्थिर सरकारची गरज आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय आहे. पण तरीही या देशाचा नागरिक म्हणून मलाही राज्यामध्ये पाच वर्षांचे एक स्थिर सरकार हवे आहे.’

Loading...
Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.