अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांना आला ब्रेन स्ट्रोकचा झटक!

मुंबई : ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कड आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी एक दुःखद घटना सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचे दीपिकाने सांगितले आहे. तसेच सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती देखील केली आहे.

शोएब आणि दीपिकाने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहले आहे की, ‘’पुन्हा एकदा तुम्हां सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे. पप्पांना ब्रेन स्टोक आल आहे आणि ते आयसीयू मध्ये आहेत. कृपया तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अल्लाह त्यांना लवकर ठिक करो.’’ तसेच त्यांनी वडिलांना रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती दिली.

तसेच चाहत्यांचे त्याने आभार देखील मानले वडिलांना इतकं प्रेम आणि आशिर्वाद देण्यासाठी धन्यवाद, आज त्यांची सर्जरी होती. आणि दोन दिवसात ते चालू लागतील.सध्या ते अंडर ऑब्जवेशनमध्ये आहे.

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास शोएबने ‘ससुराल सिमर का’, ‘कोई लौट के आया है’ , ‘इश्क में मरजावां’ सारख्या प्रसिद्ध सीरियल मध्ये झळकला होता . 2018 मध्ये त्याने ‘ससुराल सिमर का’मधील को ॲक्टर दीपिका कक्कड सोबत लग्नगाठ बांधली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा