InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अभिनेता सनी देओलने केला भाजपमध्ये प्रवेश

अभिनेता सनी देओल हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. आज अखेर सनी देओलेने अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात सनी देओलचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

“माझे वडील अनेक वर्ष भाजपच्या परिवारासोबत आहेत. वडील अटल बिहारी वाजपेयींसोबत होते, मी आता मोदींसोबत काम करणार आहे. मोदी पुढील पाच वर्षासाठी भारतात पंतप्रधान म्हणून असावे, त्यामुळे आपला देश आणखी पुढे जाईल. मी जास्त बोलणार नाही पण काम करुन दाखवून देईल”, असे सनी देओल म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.