‘खतरों के खिलाडी 11’च्या सेटवर अभिनेता वरुण सूद गंभीर जखमी

मुंबई : ‘खतरों के खिलाडी’चा अकरावा सिझन चांगलाच चर्चेत पाहायला मिळत आहे. नुकतीच सेटवरून आता एक मोठी बातमी आलीय. ती म्हणजे स्पर्धक अभिनेता वरुण सूद गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

एका अहवालानुसार अभिनेता वरुण सूद तीन चार दिवसांपूर्वी एक धोकादायक स्टंट करत असताना जखमी झाला आहे. या अपघातानंतर वरुणला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले. वरुणच्या हाताला दुखापत झाली होती. प्रत्येकाला असे वाटत होते की, त्याला फ्रॅक्चर झाले आहे, परंतु काही तासांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची तब्येत बरी झाली. मात्र, वरुणला 2 ते 3 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण त्याच दिवशी तो सेटवर पोहोचला.

शोचे शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे. या शोमधील सगळे स्टंट्स हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जातात, परंतु तरीही नेहमी कोणीना कोणी जखमी होते.सध्या या शोचे स्पर्धक स्टंटसमवेत केपटाऊनच्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत. पण ही मजा आता त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा