‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल जगतीये एकाकी जीवन 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिचा आज वाढदिवस आहे. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. आमिषाने करिअरची सुरुवात 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून केली होती. अमिषाने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बॉलीवूडमध्ये विशेष असे स्थान मिळाले नाही. सध्या अमिषा एकाकी जीवन जगत आहे. असे का?

अमिषाचे अभिनेता विक्रम भट्ट यांच्याशी नाव जोडण्यात येत होते. दोघांनी जवळजवळ 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. अमिषाचे कुटुंबीय या दोघांच्या नात्याविरूद्ध होते. अमिषाने एकदा हे स्पष्ट केले होते की, विक्रमशी तिचे नातेसंबंध तिच्या कुटुंबातील सदस्यांना आवडत नाहीत, ज्यामुळे घरात वाद वाढले होते.

यानंतर अभिनेत्री अमिषा पटेल हिचे नाव लंडनमधील व्यावसायिक कणव पुरीशीही जोडले गेले होते. अमिषाने स्वत: एकदा असे म्हटले होते की, ती कणवला डेट करत आहे. पण 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. पण, अभिनेत्री अमिषा पटेल अजूनही एकटं जीवन जगत आहे आणि सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाईलने अनेकदा चाहत्यांना घायाळ करत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा