अभिनेत्रीने वाढदिवसाला केले ‘हे’ मोठं काम; सर्वत्र होतोय कौतुकांचा वर्षाव

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते?’ मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं आहे. दरम्यान मालिकेतील एका अभिनेत्रीवर चाहते सध्या कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नेमकं हे कौतुक का होतंय? चला पाहुया.

अभिनेत्री सीमा घोगळेनं नुकताच तिचा 40वा वाढदिवस साजरा केला होता. सीमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ‘मी अवयवदान केलं आहे. माझ्याकडून मलाच वाढदिवसाचं गिफ्ट. मला 40व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असं कॅप्शन लिहित अवयवदान केल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. सीमाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि तिच्या निर्णयाचं कौतुकही केलं आहे.

सीमा घोगळे आई कुठे काय करते? या मालिकेत विमल हे पात्र साकारते. थोडीशी कोकणी भाषा असलेल्या विमल या पात्रालाही चाहत्यांची भरपूर पसंती आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा