अभिनेत्री जेनिफर विंगेट कोरोना पॉसिटीव्ह; पोस्ट शेअर करत दिली क्वारंटाइन असल्याची माहिती

मुंबई : देशात कोरोनाचे वातावरण कमी झाल्याचे दिसत होते. मात्र पुन्हा कोरोना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या जाळ्यात आता सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट सुध्दा सापडलीय. अभिनेत्री जेनिफर विंगेट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री जेनिफर विंगेटने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिलीय. अद्याप तरी करोनाचे सौम्य लक्षण दिसून येत असले तरी तिने स्वतःला घरात क्वारंटाइन केलं असल्याचं या पोस्टमधून तिने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणतीही भीती न बाळगता मोठ्या विश्वासाने यातून बाहेर पडणार असं देखील तिने सांगितलं.

या पोस्टमध्ये पुढे जेनिफरने लिहिलं, “डाउन झाले…पण आउट झाले नाही…होय, हे खरंय…करोनाने दरवाजा ठोठावलाय…मला अडकवलंय…पण मला काही सौम्य लक्षणं दिसून आली आहेत…आणि मला पूर्णपणे बरं वाटतंय…त्यामूळे लोक चिंता करत आहेत, त्यांनी कृपया चिंता करू नये…मी क्वारंटाइनमध्ये आहे…तक्रार करते आणि खातेय सुद्धा…पण पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये येण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.”

अभिनेत्री जेनिफर विंगट येत्या २० जुलैपासून ‘कोड एम’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनचं शूटिंग सुरू करणार होती. शूटिंग सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिने स्वतःची कोरोना चाचणी केली होती. पण तिचा हा रिपोर्ट करोना पॉझिटीव्हचा आला आणि ताबडतोब तिने स्वतःचा क्वारंटाइन केलं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा