८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी आता CBI कोर्टात

मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणाची सुनावणी आता सीबीआय (CBI) कोर्टात होणार आहे. ८ वर्षांपासून प्रलिंबत असलेल्या या प्रकरणावर खटला सुरू असलेल्या सत्र न्यायालयाने असे म्हटले की, हे प्रकरण सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने वर्ग केले पाहिजे.

जिया खानचं निधन वयाच्या २५ वर्षी झाले होते. ३ जून २०१३ रोजी मुंबईतील फ्लॅटमध्ये जिया मृत अवस्थेत आढळली होती. तिच्या निधनानंतर जियाची आई म्हणाली होती की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. यासाठी जियाचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली आरोपी असल्याचे सांगितले होते. जियाच्या निधनाचा तपास मुंबई पोलीस आणि केंद्रीय ब्युरोद्वारे केला जाता होता, परंतु २०१९पासून या प्रकरणाचा तपास पुढे जास्त झाला नाही. आता ८ वर्षांनंतर सीबीआय कोर्टात या प्रलंबित प्रकरणाची सुनावणी होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान सूरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील यावर म्हणाले की, ‘सत्र न्यायालयाकडून प्रकरण सीबीआय कोर्टात वर्ग करण्यात आलेल्या आदेशाचे मी आणि माझा क्लाईंट स्वागत करतो. आम्ही सुरुवातीपासून विनंती करत आहोत की, प्रकरण लवकर पुढे घ्या आणि सहा महिन्यांच्या आत यावर निर्णय घ्या. आमचा अर्ज स्वीकार केला गेला, परंतु यानंतर खटल्याला उशीरा झाला. आता सीबीआय कोर्टात दैनंदिन आधारावर खटला चालवण्यासाठी अर्ज करू.’

माहितीनुसार, जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहितेचा कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त) अंतर्गत खटला सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा