अभिनेत्री कंगना आणि गोलंदाज इरफान पठाण यांच्यात झाली वादाला सुरुवात

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद टोकाला गेला आहे. त्याचे रुपांतर हिंसेत झाले आहे. त्यात सर्वसामान्य नागरिक, लहान मुले यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून आले आहे. त्यावर बॉलीवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटिंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावर कंगणानेही आपली भूमिका मांडली खरी पण प्रसिध्द भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि तिच्यात त्यामुळे वादावादी सुरू झाली आहे.

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वादात इरफान पठाणनं पॅलेस्टाईनचे समर्थन केले. त्यानं लिहिलं आहे की, “जर तुमच्यात थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक असेल तर तुम्ही पॅलेस्टाईनच्या विरोधात काहीही लिहिणार नाही”. त्यानं दुस-या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मानवतेचा प्रचार करणारा एकच देश आहे त्याचे नाव जग असे आहे”.

इरफानची अशी भूमिका कंगणाला आवडलेली नाही. कंगणानं इंस्टावरुन एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं लिहिलं आहे की, जर इरफानला दुस-या देशांची एवढी पर्वा आहे तर मग त्यानं आपल्या देशातील पश्चिम बंगालमध्ये जे काही चाललं आहे त्याविषयी तो काहीच का बोलला नाही. असा प्रश्न कंगणानं त्याला विचारला आहे. इरफाननं देखील कंगणाला यावर उत्तर दिलं आहे. “देशात व्देष पसविल्याबद्दल कंगणाचे व्टिटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. आता ती दुस-या माध्य़मातूनही पसरवताना दिसत आहे. मी जे काही बोललो आहे ते सर्व मानवतेच्या दृष्टीनं लिहिलं आहे. मात्र मला कंगणासारखी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यापासून लांब राहतो”. असेही इरफाननं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा