वाढदिवशी ड्रग्जचं सेवन केल्याने अभिनेत्री नायरा शाहवर गुन्हा दाखल

मुंबई : सेलिब्रेटीचा वाढदिवस म्हणजे धुमधडाका आलाच. मात्र, या धुमधडाक्यात ड्रग्जचं सेवन केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी तेलुगू अभिनेत्री नायरा शाह आणि तिचा मित्र साजिद हुसैन यांना अटक केली आहे. या दोघांवर परवानगीशिवाय हॉटेलच्या रुममध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे.

रविवारी नायराचा वाढदिवस होता आणि दोन मित्रांसोबत ती हॉटेलच्या रुममध्ये पार्टी करत होती. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी अटकेची कारवाई केली. घटनास्थळी पोलिसांना ड्रग्ज आढळले. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर नायराला सोमवारी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिची जामिनावर सुटका केली.

सोमवारी सकाळी नायराची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्टमध्ये जर नायराच्या शरीरात प्रमाणापेक्षा अधिक ड्रग्ज आढळल्यास, तिच्या अडचणीस वाढ होण्याची शक्यता आहे. नायराने ‘मिरुगा’, ‘बुर्रा कथा’ आणि ‘इ-ई’ या चित्रपटांमध्ये काम केलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा