अभिनेत्री रेवती संपतने केला १४ लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप; मल्याळम फिल्म इंडस्ट्री हादरली  

केरळ : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री रेवती संपतने केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. या वक्तव्यात रेवतीने मलयालम फिल्म इंडस्ट्रीमधिल १४ लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. रेवतीने एका फेसबुक पोस्टच्या अंतर्गत १४ लोकांच्या नावाचा खुलासा केला आहे.

रेवतीने या पोस्टमध्ये प्रसिद्ध अभिनेता सिद्दीकी याचे नाव सुद्धा समाविष्ट केले आहे. रेवतीने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, १४ लोकांनी तिचा फक्त शारीरिक छळच नाही तर मानसिक भावनात्मकरित्याही त्रास दिला आहे. तसेच आरोपींना अपराधी करार दिला आहे. रेवतीने सिद्दीकी व्यतीरिक्त लिस्टमध्ये मशहूर दिग्दर्शक राजेश, डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेता नंदु अशोकण सोबतच अनेक पोलिस विभागातील प्रोफेशनमधिल लोकांचे नाव घेतले आहे तसेच यात एका डॉक्टरांचा देखिलं नाव आहे.

आरोपीनेचे नाव जाहिर केल्यानंतर रेवतीने फेसबुक पोस्टमध्ये तिला कोणत्याही व्यक्तीची भीती नाही असे जाहीर केले आहे. तसेच गुन्हेगारांना ती संपुर्ण जगासमोर आणणार आहे, असं तिने स्पष्ट केलं. रेवतीच्या या पोस्टने संपुर्ण मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडले आहे. सोशल मीडिया यूजर्सने फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या सुरक्षितते संदर्भात चिंता व्यक्त करत, आपला राग जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा