InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अभिनेत्री तेजस्विनीने जोपासला वडिलांचा ‘हा’ वारसा

- Advertisement -

‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या वडिलांनसोबत कृतज्ञेतेचे सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे वडील आता ह्या जगात नाहीत. पण तेजस्विनीने त्यांची शिकवण लक्षात ठेऊन ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतेय.

- Advertisement -

नुकताच तेजस्विनीने यंदाचा ‘फादर्स डे’ मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला. ती म्हणते, “माझे वडिल आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा करायचे. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली.”

माझे वडिल अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोर होते. ”माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचे रूप तुझ्यात सोडून गेलेत. मी दिसण्यातच नाही तर गुणांमध्येही बाबांवर गेली आहे . बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.