अभिनेत्री याशिका आनंदचा भीषण अपघात, एक जण जागीच ठार

चेन्नई : दाक्षिनात्य चित्रपट अभिनेत्री याशिका आनंद हीच अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात याशिकाचा मैत्रीण भवानी हिचा मृत्यू झाला आहे, तर याशिकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हा भीषण रस्ता अपघात झाला.

माहितीनुसार याशिका आपल्या मित्रांसह महाबलीपुरमहून चेन्नईला परतली होती. त्यांच्या कारचा चेन्नईच्या सीमेवरील भागात भीषण अपघात झाला. कारमध्ये एकूण चार जण होते. या भीषण अपघातात याशिकाची मैत्रीण भवानी ठार झाली आणि याशिकासह तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत असं आढळलं आहे की कारमधील चारही जण दारूच्या नशेत होते. कारचा वेग जास्त असल्यानं संतुलन बिघडलं आणि कार दुभाजकावर आदळली. ही टक्कर प्रचंड होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा