Adhar Card | आधार कार्ड वरील फोटो बदलायचा असेल, तर ‘या’ स्टेप्स करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात.

UIDAI ने लोकांसाठी ऑनलाईन आधार कार्ड मिळवण्यापासून ते त्याच सुधारणा करण्यापर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आधार कार्ड मध्ये बारा अंकी आधार नंबर असतो जो प्रत्येक माणसासाठी वेगवेगळ्या असतो. आणि तो आधार क्रमांक सर्वात महत्त्वाचा असतो. आधार कार्ड भारतीय लोकांसाठी फक्त ओळखपत्र म्हणून काम करत नाही तर त्याचे इतर सुद्धा अनेक फायदे आहे जे सरकारी कामांमध्ये होतात.

आधार कार्ड (Adhar Card) वरील फोटो बदलायचा असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा

तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड मधील फोटो बदलायचा असेल किंवा आधारवर दुसरा चांगला फोटो टाकायचा असेल तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. UIDAI च्या वेबसाईटवरून तुम्ही आधार कार्ड सोबतच तुमचा मोबाईल नंबर पत्ता जन्मतारीख इत्यादी गोष्टी सुद्धा बदलू शकतात.

आधार कार्ड वर फोटो बदलायचा पद्धती पुढील प्रमाणे :

  • आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार विभागात जाऊन आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला भराव्या लागेल. हा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला एनरोलमेंट सेंटरमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • इथे तुम्हाला तुमचे बायोमेट्रिकचे तपशील पुन्हा द्यावे लागतील.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फी शुक्ल 100 रुपये जमा करावे लागेल.
  • फीस भरल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल, ज्यामध्ये फोटो अपडेटेशन साठी URL दिली जाईल.
  • तुम्ही या URL च्या मदतीने आधार कार्ड अपडेट करू शकता.
  • या URL च्या मदतीने तुम्ही आधार इमेज देखील अपडेट करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.