आदित्य नारायणने घेतला इंडियन आयडलमध्ये होस्टिंग न करण्याचा निर्णय!

मुंबई : ‘इंडियन आयडल 12’ मध्ये प्रत्येक दिवसाच्या सुरूवातीला शोच्या सेटवर अनेक खळबळजनक घडामोडी घडतांना दिसतात. शोमधील अनेक पुर्व स्पर्धक तसेच परिक्षकांनी देखील या रियालिटी शोवर टिका केली आहे. अशातच आता शोमधील होस्ट आदित्य नारायण याने पुढील वर्षापासून इंडियन आयडल होस्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदित्यने दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देत म्हंटले आहे की, “मी लहानपणापासूनच टेलिव्हिजनवर काम करत आहे. तेव्हा मी खूप लहान होतो आता पुढील वर्षी जेव्हा काम सोडणार तोपर्यंत मी बाप होईन. टिव्ही इंडस्ट्रीने मला नाव, पैसा, प्रसिद्धी, यश दिलं आहे. टेलिव्हिजनमुळेच मी मुंबईत उत्कृष्ठ जीवन जगत आहे. मी टीव्हीवरील काम सोडणार नाही फक्त काही वेगळ, नवीन, मोठी गोष्ट करणार आहे.”

पुढे आदित्य म्हंटला, “माझी एका सुत्रसंचालकाच्या म्हणजेच होस्टची भूमिका आता संपणार आहे. मी पुढील वर्षापासून टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. तसेच मी गेल्या 15 वर्षापासून याचा भाग आहे. यामुळे आता मला काही वेगळ नाविन्यपुर्ण गोष्ट करायची आहे.” असं आदित्य म्हणाला आहे.

आता काही दिवसातच 15 ऑगस्टला इंडियन आयडलची ट्रॅाफी कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा