Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

पुणे :  गेल्या दहा दिवसांपासून मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज पुण्यात पोहोचले आहेत. तिथं ते विविध गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. सर्वप्रथम त्यांनी दगडूशेठ हलवाई गपणतीचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाकडं काय मागणं मागितलं, या प्रश्नावर त्यांनी खास शैलीत उत्तर दिलं.

आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले. त्यावेळी ते बोलत होते. विसर्जन मिरवणुकीसाठी आल्यान राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी विकासासाठी नक्कीच चांगले नाही. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलमताई गोऱ्हे, चंद्रकांतदादा पाटील, अजितदादा भेटले. मात्र राजकारणा विषयी काही झाले नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.