Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता! ठाकरेंचा खास शिलेदार जाणार शिंदे गटात?

Aditya Thackeray | मुंबई: ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Srikanth Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

People’s faith on Eknath Shinde is increasing day by day – Srikanth Shinde

श्रीकांत शिंदे म्हणाले, “लोकांचा विश्वास एकनाथ शिंदेंवर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर रोज नवनवीन लोक जोडली जात आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार (Aditya Thackeray) आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आगामी काळात (Aditya Thackeray) पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार इत्यादींचे शिंदे गटात प्रवेश सुरूच राहणार. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे.” श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राहुल कनाल (Rahul Kanal) 01 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि युवासेनेतील अंतर्गत वादामुळे राहुल कनाल पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/434hr6e