Aditya Thackeray | “आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता…”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

Aditya Thackeray | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह राज्यातील इतर भाजप नेते गुजरातला प्रचारासाठी जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याचं बोललं जात आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी, आज मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. कारण आपले मंत्री गुजरातच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने आधी सरकार स्थापन करण्यासाठी आमदार गुजरातला पाठवले. मग तरूणांच्या हाताला रोजगार देणारे मोठे प्रकल्प गुजरातला पाठवले आणि आता तर निवडणूक प्रचारासाठी मंत्रीही गुजरातला पाठवले!, यांना महाराष्ट्रातील प्रश्नांपेक्षा गुजरातची निवडणूक महत्वाची आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आणि तेजस्वी एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. पर्यावरणीय बदलांसंदर्भात काय करता येईल, याबाबतही चर्चा करायची आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.