Aditya Thackeray | उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा ; आदित्य ठाकरे यांची मागणी

Aditya Thackeray | मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन राज्यात आता मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळात आहे. एवढंच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा राजीनामा मागितला आहे.

यावेळी, महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती, ती इतर राज्यात गेली आहे. कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. उद्योजकांना या सरकारवर विश्वास नाही, गुंतवणूकदारांचा या सरकारवर विश्वास नाही, थोड्या दिवसाचं हे सरकार आहे. त्यांच्या अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी राज्याचं नुकसान होत आहे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे सरकार आल्यापासून राज्यातील चार प्रकल्प राज्याच्या हातून गेले असल्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज्यांमधील जनतेत अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे, त्यामुळे तुम्ही उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, आम्ही अजूनही ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत आहोत. मात्र, घटनाबाह्य सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकलं नसल्याचं देखील ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही जुलै पासून आरडा ओरडा करतोय की टाटा एअर बस प्रकल्प तरी जाऊन देवू नका, तो प्रकल्प पण आज हातून गेला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.