Aditya Thackeray | “ओरिजनल गद्दारांना मंत्रिपदं मिळणार…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aditya Thackeray | मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं आहे.

या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. ओरिजनल गद्दारांना मंत्रिपद मिळणार नाही, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आजची सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे, एका वर्षापूर्वीची जी ओरिजनल गद्दारांची बॅच होती त्यांना मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

आज विधानसभेत त्यांचे चेहरे पाहून कळत होतं की त्यांच्या मनात काय सुरू आहे. मागून आलेल्या अजित पवार गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, अजून ओरिजनल गद्दारांना मंत्रिपद मिळणार नाही.”

People from Shinde group will not get ministerial posts – Aditya Thackeray

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “शिंदे गटाच्या लोकांना वाटतं की त्यांना आज ना उद्या मंत्रिपद मिळेल. मात्र त्यांच्या मागून आलेल्या लोकांना मंत्रिपद मिळालेली आहे. मात्र, अजूनही यांना काही मिळेना. शिंदे गटातील लोकांना मंत्री पद मिळणार नाही. त्याचबरोबर त्यांना कोणतेही खाते मिळणार नाही.”

यावेळी नाना पटोले यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्याकडे बहुमत आहे. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसून सगळा उधारीचा गोळा केलेला शेंदूर आहे.

सध्याचे सरकार उधारीचा शेंदूर घेऊन एकमेकांना फसवत आहे. त्यामुळे या सरकारला शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बसण्याचा अधिकार नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44QsbX9