Aditya Thackeray | गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ आमदाराला आदित्य ठाकरेंनी मारली मिठी अन् म्हणाले…, ठाकरेंच्या मिठीची जोरदार चर्चा
Aditya Thackeray | अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अकोला येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुवाहाटीला जात असताना सुरतवरुन परत येणारे नेते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना आदित्य ठाकरे यांनी भर सभेत मिठी मारली. तसेच त्यांच्या मुलाला बोलावून त्याला प्रश्न देखील विचारले. या मिठीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यादरम्यान, मंचावर भाषण करताना हेच ते आमदार आहेत, जे गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे (CM Eknath Shinde) गटाबरोबर गेले. मात्र सूरतहूनच निघून आले. शिंदे गटाने गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख सांगतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सभेत बोलताना नितीन देशमुख आणि अरविंद सावंत यांच्या हातात हात घेत, तो उंचावून दाखवत अभिवादन केलं. राज्यातील राजकीय वर्तुळात आज आदित्य ठाकरे यांची ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे.
नितीन देशमुखांच्या मुलाला आदित्य ठाकरेंनी मंचावर बोलावून तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते, ते खोके चांगले की आजचा दिवस चांगला? यावर नितीन देशमुख यांच्या मुलाने आजचा दिवस चांगला, असं उत्तर दिलं आहे. एकंदरितच आदित्य ठाकरेंची आणखीन एक सभा जोरदार ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | “नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात” ; राज ठाकरेंची फटकेबाजी
- Lava Blaze 5G Launch | Lava ने केला सर्वात स्वस्त 5G मोबाईल लाँच
- Aaditya Thackeray | राज्यात बंटी-बबली खूप झालेत, आदित्य ठाकरेंची राणा दाम्पत्यावर टीका
- Navneet Rana | तुम्ही मॅनेज झालेत का?, नवनीत राणांवर कारवाई का नाही?, कोर्टाचा पोलिसांवर संताप
- Devendra Fadanvis | “मराठा समाजासाठी…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचं मोठं विधान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.