Aditya Thackeray | ठाकरे गट चिंतेत? आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण ED कार्यालयात दाखल

Aditya Thackeray | मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड काळात झालेल्या घोटाळ्यावरून ईडी (ED inquiry) महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Surat Chavan will be thoroughly investigated

या घोटाळा प्रकरणी ईडीनं जवळपास 15 ठिकाणी धाड टाकली. या घोटाळ्यावरून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुरज चव्हाण यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमुळे ठाकरे गटाच्या (Aditya Thackeray) चिंतेत भर पडली आहे.

सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या पाच अधिकाऱ्यांनी सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुरू असताना ठाकरे गटाच्या (Aditya Thackeray) कार्यकर्त्यांनी इमारती बाहेर गर्दी करत ईडीला विरोध केला होता.

दरम्यान, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसने कोविड काळामध्ये केलेल्या घोटाळ्यावरून ही चौकशी (Aditya Thackeray) सुरू आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. मात्र, आता ईडीनं या प्रकरणांमध्ये उडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XrRWdM

You might also like

Comments are closed.