Aditya Thackeray | दिवाळीत आदित्य ठाकरे चक्क चिमुरड्यांसोबत किल्ला बांधण्यात रमले

Aditya Thackeray | मुंबई : कोरोनाचं संकट गेल्यांनतर यंदाचे सण सर्वजणच उत्साहात साजरे करताना दिसत आहेत. दिवाळीचा सण देखील उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिवाळीनिमित्त आपल्या मातोश्री या निवासस्थानी मातीचा किल्ला उभारला आहे.

किल्ला बनवताना ते चिमुकल्यांसह रमलेले पहायला मिळाले. अत्यंत रेखीव असा किल्ला या सर्वांनी मिळून साकारला, याचा व्हिडिओ समोर आला आहे. आदित्य ठाकरेंचं एक वेगळं रूप आज पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवला आणि लहान मुलांना किल्ला बनवण्यात मदत केली.

समस्त शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान समजल्या जाणाऱ्या मातोश्री या निवासस्थानी दिवाळीनिमित्त काही लहान मुलांनी किल्ला बांधण्याचा काम सुरू केलं होतं. आदित्य ठाकरे तिथे पोहोचताच त्यांनी त्या मुलांचं कौतुक केलं. त्या लहान मुलांना किल्ला बांधण्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मदत केली आणि त्या मुलांचं मनोबल देखील वाढवलं.

या निमित्ताने आदित्य ठाकरे यांचा अनोखं रूप महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळालं. “आज मातोश्री येथे लहान मुलांसोबत त्यांच्या किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झालो आणि पुन्हा मनात बालपण जागं झालं”,अशी प्रतिक्रिया किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.