Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूरमधील रामटेक आणि कन्हान रोडवर हे पोस्टर लावण्यात आले आहे. ‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत’, असा उल्लेख या पोस्टर्समध्ये करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर लावले आहे. या पोस्टरनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

Screenshot 2023 05 22 093914 Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नागपूर दौऱ्यावर आहे. ते आज नांदगाव आणि वारडा गावाला भेट देणार आहे. त्याचबरोबर ठाकरे आज गावकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यावर पर्यावरण तज्ञ लीना बुद्धे देखील सहभागी होणार आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये पोस्टरबाजी होणे हे काही नवे नाही. कारण नागपूरमध्ये याआधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचेही पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला होता. अशात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43dNRvq