Aditya Thackeray | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सगळे पक्ष तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही (Mumbai Election) तोंडावर आली असल्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर टीका, टिपण्णी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबईमध्ये फक्त भाजपाचा खासदार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नारायण राणेंच्या वक्तव्याला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपामध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत.
पुढे आदित्य ठाकरे यांनी असंही म्हटलं की, नुसतं आमच्यावर बोलायचं, आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निवडणूक येण्यसाठी प्रयत्न करीत आहे. असं जरी असलं तरी शेवटी मुंबईवर कोणत्या पक्षाची सत्ता येतीय, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?…”, ‘या’ मनसे नेत्याने उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र
- Kishori Pednekar | ‘आईसक्रीम कोन’च्या विधावरुन किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंवर हल्ला
- Rahul Gandhi | “सिलेंडरची किंमत ४०० रुपये होती तेव्हा पंतप्रधान तक्रार करायचे, आता…”, राहुल गांधींनी विचारले सवाल
- Rohit Pawar | दिवाळी पहाट कार्यक्रमावरून रोहित पवारांचा शिंदे सरकारला टोला
- Ajit Pawar | “…तो पर्यंतच शिंदे सरकार टिकणार”, अजित पवारांचं भाकीत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.