Aditya Thackeray | ना खाती, ना इज्जत, गद्दारांना काय मिळालं? शिंदे गटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शपथ घेतलेल्या आमदारांना काल (15 जुलै) खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात तर धनंजय मुंडेंना कृषी खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. ओरिजनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलं आहे का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Is there anything left for the original traitors? – Aditya Thackeray
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत शिंदे गटाला सुनावलं आहे. ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं…पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला.
आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!”
चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं…
पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का?
ना खाती, ना इज्जत!त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 15, 2023
दरम्यान, अजित पवार गटाला खाते वाटपामध्ये महत्त्वाचे खाते मिळाले (Aditya Thackeray) आहे. यामध्ये अर्थ आणि नियोजन – अजित पवार (Ajit Pawar), कृषी – धनंजय मुंडे (Dhananjay Munde), महिला व बालविकास – अदिती तटकरे (Aditi Tatkare), मदत पुनर्वसन – अनिल पाटील (Anil Patil) यांना मिळालं आहे.
तर सहकार – दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), अन्न आणि नागरी पुरवठा – छगन भुजबळ (Chagan Bhujbal), अन्न व औषध पुरवठा – धर्मरावबाबा आत्रम (Dharmaraobaba Atram), क्रीडा – संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना मिळालं आहे.
खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात (Aditya Thackeray) आहे. कारण अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये, असं मत शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केलं होतं. मात्र, अर्थ खात अजित पवारांकडे गेल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला देशात कुठेच पाहायला मिळणार नाही – अजित पवार
- Ajit Pawar | शरद पवारांना पुन्हा एक धक्का! पवारांचा आणखीन एक शिलेदार अजित पवार गटात सामील
- Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका
- Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
- Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PXHTLY
Comments are closed.