Aditya Thackeray | मोठी बातमी! मुंबईत आदित्य ठाकरेंच्या गाडीचा झाला अपघात

Aditya Thackeray | मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक येऊन धडकली आहे. त्यांच्या या अपघातानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Aditya Thackeray’s car has been hit by a biker

आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एका बाईकस्वाराने धडक दिली आहे. शिवसेना भवनाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली आहे. आदित्य ठाकरे यांची गाडी टर्न घेत असताना बाईकस्वाराने मागून येऊन ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हा अपघात झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बाईकस्वाराची विचारपूस केली. दुचाकी चालवणाऱ्या त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिल्यानंतर ही व्यक्ती पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, आदित्य ठाकरेंच्या अंगरक्षकांनी त्याला पकडलं.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना नॉर्मल असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r1qzel