Aditya Thackeray | “…म्हणून त्यांचं वरळीवर जास्त लक्ष!”, आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावूक पत्र

Aditya Thackeray | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे वरळी (Waroli) येथील आमदार आहेत. आमदार पदाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीकारांशी पत्राद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळीकरांना भावनीक साद घातली आहे. तसेच यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे गटावर देखील टीका केली आहे.

आपण केलेल्या वरळीतील कामामुळे सर्वच राजकीय पक्षांचं इकडे लक्ष लागलं आहे, त्यांना इथे वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो, त्यांनी इथे बेकायदेशीररित्या लावलेले बॅनर्स हेच दाखवतात की, आपण इथे केलेली कामगिरी हेवा वाटण्यासारखी आहे, अशे भाव आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पत्रात व्यक्त केले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे, आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+’ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत…, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत, असं पत्रात म्हटलं आहे.

65c6bcb2 fd1d 4ebe 93ce 14e0fd1b8dc9 Aditya Thackeray | "...म्हणून त्यांचं वरळीवर जास्त लक्ष!", आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावूक पत्र
#image_title #separator_sa #site_title Marathi Latest News | Marathi News | Marathi batmya | मराठी बातम्या |

म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटत असल्याचं देखील ठाकरे म्हणाले.

यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेल. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील. जय हिंद जय महाराष्ट्र!, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्राचा अंत केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.