Aditya Thackeray | “वेदांता प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं…”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
Aditya Thackeray | मुंबई : राज्यातील चार मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प गुजरातला गेले. नुकताच हातून गेलेला टाटा एअर बस (Tata Air Bus) प्रकल्पावरुन राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली असून राज्य सरकार वर त्यांनी घणाघात केला आहे.
यादरम्यान, वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही त्यांना टाटा एअर बस प्रकल्पाच्या मागे लागा असं सांगितलं होतं. मात्र, तरी सुद्धा हातातला प्रकल्प गेलाच कसा, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
परतिच्या पावसामुळे मराठवाडा येथील शेतकऱ्यांचे अर्थात राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर देखील सरकार काही करत नाहीये, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, आम्ही अजूनही ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत आहोत. मात्र, घटनाबाह्य सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकलं नसल्याचं देखील ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही जुलै पासून आरडा ओरडा करतोय की टाटा एअर बस प्रकल्प तरी जाऊन देवू नका, तो प्रकल्प पण आज हातून गेला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | राज्यातील तिसरा मोठा प्रकल्प गुजरातला गेला अन् एकनाथ शिंदे म्हणतात…
- Kisan Samridhi Kedra | किसान समृद्धी केंद्र द्वारे शेतकरी मिळवू शकतात अनेक सुविधा, जाणून घ्या
- T20 World Cup | फ्लॉप झालेल्या केएल राहुलऐवजी ऋषभ पंतला ओपनिंगची संधी? संघ प्रशिक्षकाची मोठी माहिती
- Eknath Shinde | “मी सगळ्यांना कामाला लावलं”, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी
- Social Media Update | सोशल मीडियाला आता केंद्र सरकारचा आळा, तयार केले नवीन IT नियम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.