Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Aditya Thackeray | नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. जरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार वाचलं असलं तरीही 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अजूनही निर्णय झालेला नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष यांनी लवकरात – लवकर घ्यावा असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वीच सत्ताधारी सरकार स्थिर असल्याचं सांगितलं जातं असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा देखील रंगत आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या हालचाली वाढल्या असुन आज आदित्य ठाकरे दिल्ली असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) माध्यमांशी संवाद साधत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे (What Aditya Thackeray said)
आदित्य ठाकरे म्हणाले की, सुप्रीम कोर्टने दिलेल्या निकालात आम्ही आर्धी लढाई जिंकली आहे. अजूनही पूर्ण लढाई लढायची राहिली आहे. यामुळे आता वकिलांसोबत भेट घेतली. पुढची पावलं उचलणार आहोत. निकाल लागलेला आहे जे काही असेल तो निकाल विधानसभा अध्यक्षांकडून येईल. त्यानंतर पुढची पावलं उचलणार आहोत. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसचं त्यांनी आजच्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत देखील प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, “आजचं बहुमत काँग्रेसला मिळालं आहे. आज वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली आहे”. हे बदलाचे वारे आता वाहू लागलं असून येणाऱ्या काळात हा बदल सर्वत्र पहायला मिळेल. इथून 40 % सरकार तर गेलं आहे परंतु, अजूनही महाराष्ट्रात एक भ्रष्ट, खोके सरकार आहे ते देखील लवकरच हद्दपार होईल. महाराष्ट्रातली जनता लवकरच या सरकारला महाराष्ट्रातुन पळवून लावणार आहे असा आम्हाला विश्वास आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
- Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
- Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?
- Karnataka Election Result | कर्नाटक निवडणूक निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! पाहा लोकांची क्रिएटिव्हिटी
Comments are closed.