Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल

Aditya Thackeray | रायगड: रायगडमधल्या इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील पोहोचले आहे.

या ठिकाणी पोहोचताच आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “इर्शाळगड येथे जास्त गर्दी होता कामा नये. त्या ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे आपण सगळ्यांनी दुरूनच त्यांना होईल ती मदत करावी. घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या वस्तीतील नागरिक सुरक्षित आणि सुखरूप असावे एवढीच अपेक्षा सध्या आपण करू शकतो.”

Do you think the government could have prevented this accident? – Aditya Thackeray

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? या वस्तीतील लोकांचे आधीच पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं का? या सर्वांबद्दल बोलायला ही योग्य जागा नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही विधानसभेत बोलू. सध्या नागरिकांना मदत मिळणे आवश्यक आहे.”

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास दरड कोसळली आहे. या दरडीखाली 200 ते 250 लोकसंख्या असलेली वस्ती दबून गेली आहे. रात्री लोक झोपेत असताना (Aditya Thackeray) त्यांच्यावर हे नैसर्गिक संकट कोसळलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pVnBIg